Ad will apear here
Next
रिदम वाघोलीकर यांना ‘वर्ड स्मिथ ऑफ इयर’ पुरस्कार
युवा लेखक रिदम वाघोलीकर यांना यंदाचा ‘वर्ड स्मिथ ऑफ इयर’ पुरस्कार अभिनेता राजकुमार राव आणि संजना गलरानी यांच्या हस्ते देण्यात आला.

मुंबई  : संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्मित्त्वांवर, तसेच तृतीयपंथी गौरी सावंत यांच्यावर लेखन करणारे युवा लेखक रिदम वाघोलीकर यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र अचिव्हर्स अॅवॉर्डस्’च्या ‘वर्ड स्मिथ ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. अभिनेता राजकुमार राव आणि संजना गलरानी यांच्या हस्ते वाघोलीकार यांना हा पुरस्कार देण्यात आला. 

‘ईटी एज’ आणि ‘फेमिना’ यांच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात. सिनेमा, क्रिडा, उद्योग-व्यवसाय, वैद्यकीय आणि कला क्षेत्रात महाराष्ट्राचा अभिमान वाढविण्याचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना ‘महाराष्ट्र अचिव्हर्स अॅ्वॉर्ड’ देऊन सन्मानित केले जाते. 
 
रिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर शहा यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत. लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक ग्रामोफोनच्या, तर किशोरीताईंवरील पुस्तक स्वरमंडळाच्या (इंडियन हार्प) आकारात आहे. 

आता रिदम वाघोलीकर यांनी तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांचा जीवन प्रवास उलगडणारे, ‘गौरी- द अर्ज टू फ्लाय’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी लहान वयात प्राप्त केलेल्या लोकप्रियतेमुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. 

या कार्यक्रमात रिदम वाघोलीकर यांच्या समवेत अभिनेत्री अलिया भट, राणी मुखर्जी, दिग्दर्शक एकता कपूर, बप्पी लाहिरी, अभिनेता विकी कौशल, क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि केदार जाधव यांनादेखील गौरविण्यात आले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZPQBY
Similar Posts
खासदार बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ पुस्तकाचे प्रकाशन नवी दिल्ली : ‘खासदार श्रीरंग बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकात संसदीय कामकाजाचा लेखाजोखा मांडला आहे’, असा गौरव लेाकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केला. येथील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांच्या हस्ते खासदार बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ या मराठी व इंग्रजी पुस्तकाच्या आवृत्तीचे गुरुवारी प्रकाशन झाले
मंजूषा पाटील यांना कुमार गंधर्व सन्मान पुणे : ‘राष्ट्रीय कुमार गंधर्व सन्मान’ युवा शास्त्रीय गायिका मंजूषा पाटील यांना जाहीर झाला आहे. सव्वा लाख रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मध्य प्रदेश सरकारतर्फे संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. पाटील यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याचे
जोवरी हे जग, तोवरी गीतरामायण... ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात रामनवमीच्या औचित्याने गीत रामायणावरचा हा लेख....
संगीत सरित्सागर आपल्याला संगीताच्या शास्त्राचे ज्ञान नसले, तरी सुश्राव्य संगीतामुळे स्वर्गीय आनंद होतो. हृदय प्रफुल्लित होते आणि अंगावर रोमांच उभे राहतात. त्याचे थोडेफार ज्ञान मिळाले, समजून उमजून गाणे ऐकले, तर त्याच आनंदाची श्रेणी वाढते. हळूहळू राग ओळखता येतात आणि त्यावर आधारित कुठल्याही प्रकारची गाणी चटकन लक्षात येतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language